ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्यास गुणवत्ता दाखवून नावलौकिक वाढवतात- काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्यास गुणवत्ता दाखवून नावलौकिक वाढवतात- काळे

  राहुरी(वेबटीम)   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे मात्र शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ नसल्याने हे विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्...

 राहुरी(वेबटीम)



  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे मात्र शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ नसल्याने हे विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये मागे पडतात त्यांना आर्थिक पाठबळ दिले तर ते नक्कीच आपली गुणवत्ता दाखवून देतात व परिसराचा नावलौकिक वाढवतात असे प्रतिपादन दि राहुरी अर्बन पतसंस्था चेअरमन रामचंद्र काळे यांनी केले आहे.

       याबाबत माहिती अशी की,दि राहुरी अर्बन पतसंस्था च्या माध्यमातून राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना सुमारे अडीचशे वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दि राहुरी अर्बन पतसंस्थेचे संचालक योग गुरु किशोर थोरात सुभाष घोरपडे डॉक्टर बबनराव वाकचौरे अशोक गोपाळे विद्यालयाचे प्राचार्य लुकस संसारे पर्यवेक्षिका राणी साळवे शिक्षक प्रतिनिधी विशाल तागड, शिक्षिका प्रतिनिधी उज्वला दिघे शिक्षकेतर प्रतिनिधी भाऊसाहेब पगारे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना रामचंद्र काळे यांनी सांगितले की, परिसरातील अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे विद्यार्थी या विद्यालयांमध्ये आहेत त्यांची गरज ओळखून आम्ही त्यांना ही अल्पशी मदत करत आहोत त्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत. ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे मात्र त्यांना आर्थिक पाठबळाची नेहमी गरज पडलेली आहे ज्यांना आर्थिक पाठबळ मिळाले असे अनेक विद्यार्थी शिक्षणामध्ये चमकले आहेत व मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत म्हणूनच आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे यापुढे ज्यांना गरज असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच आमच्याकडून शक्य ती मदत करू.

      यावेळी कार्यक्रमास बाबासाहेब शिरसाठ, नितीन घोलप, लक्ष्मीकांत नाईक, शोभा आमले, सुनील जगताप, माणिक मेहत्रे, सुनील कांबळे, चांगदेव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केले तर आभार युसुफ तांबोळी यांनी मांनले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत