देवळाली प्रवरा(वेबटीम) लोकशाहीला मूठमाती देऊन महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या भाजपाला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता वाट पाहत असून शिवसैन...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
लोकशाहीला मूठमाती देऊन महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या भाजपाला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता वाट पाहत असून शिवसैनिक सज्ज झाल्याचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या राहुरी तालुक्यातील ३२ गावातील पदाधिकाऱ्यांना बैठकीत बोलताना सांगितले.
श्रीरामपूर मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावातील पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी २००९ पासून आमचे देवळालीसह ३२ गावे श्रीरामपूरला जोडली गेली मात्र निवडणूक संपल्यानंतर आमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. शिवसेनेवर प्रेम करणारे हजारो शिवसैनिक आज घरी बसून आहे, कोणी वाली नसल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे, शासकीय काम संघटनात्मक कामे करताना अडचणी येतात. त्यासाठी नव्याने जिल्हाप्रमुख म्हणून तुम्ही साथ द्या अशी एक मुखी मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी पक्ष अडचणीत असताना संपर्क प्रमुख बबकरावं घोलप व सचिव विनायक राऊत व पक्षप्रमुख यांनी जी जबाबदारी टाकली ती सार्थ ठरविण्याकरता मी तुमच्या कुटुंबाचा घटक म्हणून सदैव तुमच्याबरोबर राहील यापूर्वी काय झाले त्याचा विचार करण्यापेक्षा भविष्यात उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेली संघटना आपल्याला उभी करावी लागेल. असे सांगत गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक धोरण आपण राबवत आहोत. शेतकरी, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार व सर्वसामान्य जनतेकरिता एक शिवसैनिक म्हणून शिवसैनिकांनी काम करावे. प्रशासन असो व सार्वजनिक जीवनातील कोणत्याही प्रश्न असो तो सोडवण्याकरिता जिल्हाप्रमुख या नात्याने मी सदैव तुमच्या बरोबर आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या औचीत्य साधून 32 गावात शिव सप्ताह राबवण्याचे ही या बैठकीत ठरले. महाराष्ट्रातील जनता आज पक्षप्रमुखांच्या पाठीशी उभी असून महाराष्ट्राचे बिहार करणाऱ्या भाजपाला धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी सदाभाऊ कराड, अरुण पाटील, तसेच उपजिल्हा प्रमुख शेखर दूभैय्या, अरुण गव्हाणे, रोहन भुजाडी सचिन लाटे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शत्रुघ्न गव्हाणे, सुधाकर तावडे, अहमद जहागीरदार, उप तालुका प्रमुख विजय बडाख, सुनील गायकवाड, प्रदीप वाघ,तुषार गायकवाड, दिनेश सोनवणे, कृष्णा गाडेकर, राहुल तमनर, मयूर शिंदे, विजय गव्हाणे , अरुण भोसले, सोहील शेख, रोशन बाचकर, भूषण भुजाडी, अमन शेख, योगेश मालकर, सचिन गजभिव, अमोल गायकवाड, शुभम जाधव, आकाश गुंजाळ, अनिकेत पवार, प्रमोद गायकवाड, नारायण घाडगे, अनिल खप,के ऋषिकेश मानदंड, गौरव साबळे आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपास्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत