राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींना एका परगावच्या पुरूषाने छेडछाड क...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींना एका परगावच्या पुरूषाने छेडछाड केल्याची घटना घडली. याबाबत प्राचार्य संसारे यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पत्र पाठवून सदर छेडछाड करणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी हायस्कुलची जेवणाची सुट्टी दुपारी १.३० वा. होत असते. आज ४ जुलै २०२३ रोजी नेहमीप्रमाणे विद्यालयाची जेवणाची सुट्टी झाली असता विद्यालयातील ४ विद्यार्थीनी विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेल्या होत्या. यावेळी अज्ञात २५ ते ३० वयोगटाच्या एका पुरुषाने या विद्यार्थिनींना विविध प्रकारचे हावभाव करुन छेडले. सदर घटना या विद्यार्थीनींनी विद्यालयाचे सेवक भाऊसाहेब पगारे यांना सांगितली असता श्री. पगारे यांनी सदर पुरुषाला विद्यालयांत पकडून आणले. यावेळी त्याच्यामागे काही महिला व एक वृद्ध पुरुष देखील विद्यालयामध्ये आले. आम्ही मढीवरुन दिंडोरीकडे चाललो आहोत, अशी बतावणी सदर नागरिकांनी केली व इतर शिक्षक कर्मचारी येईपर्यंत त्यांनी विद्यालयातून पळ काढला. काहींनी त्यांचा पाठलाग केला परंतु त्यांनी धूम ठोकली.
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार सदर पुरुष व त्याच्याबरोबरचे लोक एर्टिगा या पांढ-या रंगाच्या वाहनामधून आले होते आणि सदर गाडी ही कोल्हारच्या दिशेने गेली.
याबाबत प्राचार्य संसारे यांनी पोलीस निरीक्षक जाधव यांना रीतसर तक्रार दिली असून पोलीस खात्यामार्फत सदर छेड करणा-या पुरुषावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत