देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची बदली होऊन अहमदनगर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून पदोन्नती झाल...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची बदली होऊन अहमदनगर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून अजित निकत हे २५ जुलै २०१९ पासून काम बघत असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी अथक परिश्रम घेतले. त्यांची पदोन्नतीने अहमदनगर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाल्यानंतर आज त्यांचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके म्हणाले की, ज्या ज्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न घेऊन पालिकेत आलो त्या त्या वेळी ते तातडीने मार्गी लावण्याचे काम मुख्याधिकारी निकत यांनी केले असून नुकताच भेडसावलेला पाणी प्रश्न त्यांनी पूर्णवेळ देऊन तातडीने सोडविला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष चोळके यांच्यासह पल देवळाली वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष संदीप कदम, वसीम शेख, अर्जुन लोळगे , गणेश औटी, कैलास इंगळे तसेच सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पवार, गोरक्षनाथ पवार पवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत