राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन , मुंबई...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन , मुंबई व श्री महारुद्र हनुमान नागरी पतसंस्था यांच्यावतीने राज्यस्तरीय सहकार मित्र पुरस्कार जाहीर झाला असून रविवार ३० जुलै रोजी नाशिक येथे सहकारमंत्री ना.दिलीप वळसे व अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर(नाशिक) येथे पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
सहकारी पतसंस्था चळवळ सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी आणि त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ ही अतिशय नावाजलेली आणि सन्मानाची चळवळ आहे. महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यांतर्गत कार्यरत असणाऱ्या पतसंस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. या चळवळीमध्ये सुरेश वाबळे यांचे मोलाचे योगदान आहे. याचबरोबर केंद्रीय सहकार कायद्यान्वये मल्टीस्टेट पतसंस्थांचे जाळेसुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे. मल्टीस्टेट पतसंस्थांना एका छत्राखाली आणून त्यांचे शिस्तबध्द कामकाज चालविणेमध्ये वाबळे यांचे प्रयत्न मोलाचे आहेत.
या दोन्ही प्रकारच्या पतसंस्था चळवळीचा समतोल साधण्याचे भरीव काम करत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि श्री महारूद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे यांना'राज्यस्तरीय सहकार मित्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे ३० जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता श्री सद्गुरू धाम आश्रम, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत