राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून धर्मांतरासाठी दबाब टाकल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून धर्मांतरासाठी दबाब टाकल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलीने स्वतंत्र फिर्याद दिल्याने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या फिर्यादित १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने म्हंटले की, सन २०२१ ते दि. २६ जुलै २०२३ या कालावधीत आवेज शेख हा मी हिना शेख हीच्याकडे क्लासला गेल्यावर पाठलाग करुन मला थांबवुन "तु मला खुप आवडते,माझे तुझ्यावर प्रेम आहे" असे लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करायचा व मी हिना हिच्या क्लासमध्ये गेल्यावर तुम्ही मुस्लिम मुला-मुलींशी बोलत जा,असे सांगुन आरोपी आवेज शेख यांच्याशी जाणीवपुर्वक बोलायला लावुन त्यास चिथावणी दिली.त्यानंतर आवेज शेख याने पिडीत मुलीस इन्स्टाग्राम अकाऊन्टवरुन व फोन वरून तिस मी माझा हात कापुन घेईल व माझा जिव देईल,तुला व तुझ्या घरच्यांना गुंतवेल अशी धमकी देवुन तिच्याशी बळजबरीने ओळख केली.त्यानतंर आरोपी आवेज शेख व कैफ शेख यांनी फिर्यादीचा मोटारसायकलवर पाठलाग करुन तिस पुन्हा धमकी दिली त्यानंतर आरोपी आवेज शेख व कैफ शेख, हिना शेख,सोहेल शेख ,शाकिर सय्यद , सलिम पठाण,हुसेन शेख (भैय्या),अल्ताफ शेख( सर्व रा.उंबरे ता . राहुरी यांनी पिडीतास थांबवुन "तु आवेश शेख यांचेशी मैत्री कर,तो तुझ्याशी लग्न करेन.आम्ही तुमचे लग्न लावुन देऊ, सगळा खर्च आम्ही करु,तुझ्या वर्गातील मुलींसोबत ओळख करून दे आम्ही त्यांच्याशी लग्न करु." असे बोलले त्यानंतर पिडीतास तु हिंदु धर्म सोड आमचे मुस्लिम धर्म स्विकार कर तु बुरका घालत जा म्हणजे हिंदु मुले तुला त्रास देणार नाहीत त्यांची वाईट नजर तुझ्यावर पडणार नाही.तु बांगड्या घालत जावु नकोस, कपाळावर गंध व टिकली लावत जावु नको, मला ते आवडत नाही आमच्या मुस्लिम धर्माच्या मुली जशा राहतात तशा राहत जा.आपण लवकर घर सोडुन पळुन जाणार आहेत त्या करता,आपल्याला असे बोलुन कैफ शेख, हिना शेख,सोहेल शेख ,शाकिर सय्यद , सलिम पठाण,हुसेन शेख (भैय्या),अल्ताफ शेख( सर्व रा.उंबरे ता . राहुरी) आपल्याला मदत करणार आहेत व पैशाची मदत करणार आहेत असे सांगुन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व एक दिवस रात्रीचे वेळी पिडीताचे घराचे पाठीमागे येवुन पिडीता सोबत फोटो काढून तीच्याशी लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आवेज शेख कैफ शेख, हिना शेख,सोहेल शेख ,शाकिर सय्यद , सलिम पठाण,हुसेन शेख (भैय्या),अल्ताफ शेख( सर्व रा.उंबरे ता . राहुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिल्या फिर्यादीत म्हंटले की, आवेज निसार शेख व कैफ शेख हे पीडित फिर्यादीचा वारंवार पाठलाग करुन आवेज शेख यानी फिर्यादी हीचे सोबत ओळख निर्माण करून तिच्याशी मैत्री वाढवुन "तुम्ही खुप छान दिसता माझे तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्याशिवाय मी राहु शकत नाही" असे म्हणुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न केली तसेच फिर्यादीस वारंवार इन्साटाग्रामवर मेसेज करुन तुम्ही आमचे मुस्लिम धर्मात या मुस्लिम धर्मात आल्यावर तुम्हाला आम्ही बुरखा घालायला देऊ,बुरखा घातल्यानंतर हिंदु मुले तुम्हाला त्रास देणार नाही व तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही.मुस्लिम धर्मात आल्यानंतर तुम्हाला बांगड्या,कुंकु,टिकली लावता येणार नाही.तुम्हाला मुस्लिम मुलीसारखे वागावे लागेल,असे म्हणुन आरोपी हिना शेख हिने फिर्यादीस तुम्ही नेहमी हिंदी मध्ये बोलत जा,मुस्लीम मुलामुलींशी बोलत जा. त्याने मैत्री वाढण आता तुम्हाला इथुन पुढे आमच्या सारख वागायच आहे व रहायचे आहे असे वारंवार बोलुन आवेश शेख याच्याशी बोलण्यास प्रवृत्त केले आहे व आरोपी आलिशा शेख हिने आवेज शेख याचा मोबाईल वरुन पीडित फिर्यादिस फोन करून वेळोवेळी आरोपी आवेज शेख याचे बोलणे करुन देऊन पीडित फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यासाठी आवेज शेख याने प्रवृत्त केले आहे. कैफ शेख,सोहेल शेख,हिना शेख, आलिशा शेख ,सलिम पठाण,अल्ताफ शेख, शाकिर सय्यद ( सर्व रा.उंबरे ता . राहुरी) यांनी सदर गुन्ह्यातील आवेज शेख यास गुन्हा करण्यास मदत केलयाप्रकरणी आवेज शेख कैफ शेख,सोहेल शेख,हिना शेख, आलिशा शेख ,सलिम पठाण,अल्ताफ शेख, शाकिर सय्यद ( सर्व रा.उंबरे ता . राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे व पोलीस उपनिरीक्षक नीरजकुमार बोकील हे करीत आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत