राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची बढती झाली असून त्यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्त...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची बढती झाली असून त्यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी निकत यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकी मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना शहराच्या दृष्टीने महत्वाचे प्रकल्प व इतर नागरी समस्या सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
कोविड काळात देवळाली प्रवरा शहरात केलेले काम उल्लेखनीय राहिले असून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळाली प्रवरा नगरपालिकेचा नावलौकिक कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले आहे.
मुख्याधिकारी निकत यांच्या बढतीचा आदेश आज प्राप्त झाला असून त्यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत