अधिकमास पौर्णिमानिमित्त मंगळवार दि.१ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र ताहाराबाद(बेलकरवाडी) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अधिकमास पौर्णिमानिमित्त मंगळवार दि.१ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र ताहाराबाद(बेलकरवाडी) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ताहाराबाद (वार्ताहर)  अधिकमास पौर्णिमानिमित्त मंगळवार दि.१ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र ताहाराबाद(बेलकरवाडी) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोज...

ताहाराबाद (वार्ताहर)



 अधिकमास पौर्णिमानिमित्त मंगळवार दि.१ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र ताहाराबाद(बेलकरवाडी) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

        बेलकरवाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात पहाटे काकडा भजन,सकाळी महाभिषेक, दुपारी भावगीतांचा कार्यक्रम, सायंकाळी ४ वा. संत -महंतांचे स्वागत व मिरवणूक,५ वाजता महंत शांतीब्रह्म लक्ष्मणजी महाराज पांचाळ यांच्या अमृतमहोत्सव निमित्त ‘गुणगौरव सोहळा’ व सायंकाळी ५.३० वाजता महंत प.पू. जगद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज ( मठाधिपती, श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर.) यांची कीर्तन सेवा होणार आहे. नंतर ८वा. पुरणपोळी पंचांन्न (धोंडा)महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी ह्या ज्ञानदान व अन्नदान यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन बेलकरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

         महंत प.पू. जगद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज श्री संत कवी महिपती महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहे. तेव्हा देवस्थानच्यावतीने अरुणनाथगिरीजींचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. स्व. रावसाहेब कोंडाजी पाटील साबळे (अण्णा) माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पावली , नृत्यासाठी गाडकवाडी येथील सुरसे परिवाराचा अश्व, बेलापूर येथील अश्वबग्गी, सनईचौघडा व फटाक्यांच्या आतषबाजीत महाराजांचे स्वागत करण्यात येणार आहे. संत महिपतींच्या दर्शनानंतर अरुणनाथगिरीजी महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी जीवन व संस्कार, राष्ट्रप्रेम' ह्या विषयावर व्याख्यान देणार आहे. तद्नंतर अरुणनाथगिरीजी महाराजांचा दर्शन सोहळा होईल.  महाराज बेलकरवाडीला जाताना ताहाराबाद येथील स्वामी समर्थ केंद्राला भेट देऊन बेलकरवाडीकडे प्रस्थान करणार आहे.बेलकरवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. एक -व्यक्ती, एक -झाड ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होईल.

        श्रावणसरी अधून- मधून बरसत आहे.त्यामुळे ताहाराबाद पंचक्रोशी हिरवाईने नटली आहे. अशा आनंदमय वातावरणात श्रावणमास-अधिकमास पर्वणीत हा धार्मिक सोहळा संपन्न होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत