देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवराचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल श्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवराचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.लहू कानडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब खांदे व माजी नगराध्यक्षा इंदुमती खांदे यांचे चिरंजीव सागर खांदे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आ.कानडे यांनी सन्मान केला.
यावेळी बाळासाहेब खांदे, काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी, वैभव गिरमे, कृष्णा मुसमाडे, राहुल महांकाळ, सौ.कानडे, इंदुमती खांदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत