नवमतदारांनी मतदार यादीत नोंदणी करावी : प्रांत सावंत पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नवमतदारांनी मतदार यादीत नोंदणी करावी : प्रांत सावंत पाटील

श्रीरामपूर(संदीप पाळंदे)  लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसतसा निवडणुक आयोग झाडून कामाला लागलेला दिसतो आहे. दि. ०१ ज...

श्रीरामपूर(संदीप पाळंदे)



 लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसतसा निवडणुक आयोग झाडून कामाला लागलेला दिसतो आहे. दि. ०१ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या संधीचा लाभ घेऊन सर्व 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन श्रीरामपूरचे प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

याविषयी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी नुकतीच श्रीरामपूर तालुक्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत महाविद्यालयांतील प्रवेश घेतलेल्या 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करावी. महाविद्यालय व विद्यालयांत मतदार साक्षरता मंच, एन.एस.एस, विद्यार्थी प्रतिनिधी यांचेमार्फत तर राजकीय पक्षांनीही आपले स्तरावरून मतदार नोंदणीबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले. तसेच आगामी काळात आयोगाचा पथदर्शी उपक्रम असलेल्या 'स्वीप' अंतर्गत मतदारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी पाटील यांनी दिली. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवडणुक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, महसूल सहायक संदीप खाडे, संदीप पाळंदे, प्रितेश तांदळे उपस्थित होते.


 बी.एल.ओ आपल्या दारी

"मतदार यादी शुद्धीकरणासाठी बी.एल.ओ घरोघरी भेटी देणार असून यावेळी नवीन मतदार नोंदणी, मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची वगळणी, मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती, आधार लिंकिंग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदार यादी अद्ययावत होणार आहे."



 मतदारांनी घ्यावा पुढाकार : तहसीलदार वाघ

"मतदार नोंदणी प्रक्रिया हि निरंतर सुरु असून मतदारांनी स्वतः पुढाकार घेऊन मा. भारत निवडणुक आयोगाने सुरु केलेल्या वोटर हेल्पलाईन अँप, मतदाता सेवा पोर्टर, आपल्या भागातील बी.एल.ओ तसेच ऑफलाईन पद्धतीने नमुना 6 भरून नाव नोंदणी करावी. याकामी काही अडचण असल्यास निवडणूक शाखेमध्ये संपर्क साधावा."



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत