राहुरी(प्रतिनिधी) गिरिकर्णिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा डेपो येथे 200 आंब्याची झाडे लावून फळबाग कर...
राहुरी(प्रतिनिधी)
गिरिकर्णिका ग्लोबल फाऊंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा डेपो येथे 200 आंब्याची झाडे लावून फळबाग करण्यात आली तसेच वाघाचा आखाडा शाळा नं. ३ या ठिकाणी ४० विविध प्रकारची झाडांची लागवड करण्यात आली. गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने आत्तापर्यंत जवळपास राहुरी हद्दीत जवळपास २००० झाडांची लागवड करण्यात आली असून संगोपन देखील केले जात आहे. झाडांचे महत्त्व पटवून देऊन लोकांना जनजागृती करण्याचे काम केले जात आहे.
या प्रसंगी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर आगलावे, विशाल खेडकर, विजय विवाल बाळासाहेब बर्डे, न.पा. कर्मचारी आदि उपस्थित होते तसेच वाघाचा आखाडा येथील गणेश वाघ, सोमनाथ गागरे, राहुल धसाळ, नारायण कटारे, मोहर तनपुरे, ललित तनपुरे आदि उपस्थित होते. या प्रसंगी गिरीकर्णिकाचे प्रदिप सोनवणे, प्रितेश तनपुरे, अविनाश शिंदे, प्रतिक डावखर, मयुर तनपुरे, सुनिल वर्पे , किशोर पवार, सोहम सोनवणे,आशुतोष शिंदे, दत्ता शिंदे, रोहित महाले, मयुर उंडे आदि सदस्य उपस्थित होते. किशोर पवार यांनी प्रास्ताविक केले व प्रितेश तनपुरे यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत