राहुरी(प्रतिनिधी) प्रवेश प्रकिया सुरू, विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने नामी संधी राहुरी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या प...
राहुरी(प्रतिनिधी)
प्रवेश प्रकिया सुरू, विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने नामी संधी
राहुरी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेस वाणी कॉलेज फार्मसीला नुकतीच मान्यता मिळाली असून फार्मसी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रा.दत्तात्रय वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१९ पासून मिसेस.सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसी कार्यरत असून अनेक विद्यार्थी घडविले असून आज असंख्य विद्यार्थी फार्मसी क्षेत्रात उच्च पदावर आहेत.
शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध अवांतर उपक्रम नियमितपणे राबविले जातात. विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल व्हिजिट, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या तज्ञ मंडळींची व्याख्याने, आदींचे आयोजन करण्यात येते.गुणांना वाव मिळण्यासाठी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते.
याबाबत माहिती देताना प्रा.दत्तात्रय वाणी म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये वाणी कॉलेज ऑफ फार्मसीला नुकतीच मान्यता भेटली असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने ही मान्यता दिली. PCI Code: 8681. डिप्लोमा इन फार्मसीसाठी .MSBTE ने पण मान्यता दिली MSBTE Code: 62363. डीरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन तंत्र शिक्षण मंडळ मुंबई (DTE)यांनी मान्यता देऊन आपला DTE code: 5515 देऊन कॉलेजला 2023-24 साठी मान्यता दिली असून प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे.
गेल्या २०१९ पासून कार्यरत मिसेस.सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसी कोड 5481 असून त्यामध्ये बी फार्मसीसाठी 60 क्षमता, डी फार्मसी 60 क्षमता तसेच बी फार्मसी थेट द्वितीय वर्षासाठी 25 सीट उपलब्ध आहेत. त्यामध्येच ॲडव्हान्स डिप्लोमा इन लॅबरोटरी टेक्निशन हा कोर्स महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कोर्स असून 60 क्षमता कार्यरत आहे.
फार्मसी प्रवेशासाठी प्रवेश प्रकिया सुरू करण्यात आली असून यासाठी तातडीने 7745001000, 9689682123, 7387188565 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ए .बी वाणी व सचिव डी.बी वाणी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत