पाच वर्षांपासून जबरी चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पाच वर्षांपासून जबरी चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

अहमदनगर(वेबटीम)     दरोड्याची तयारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून जे...

अहमदनगर(वेबटीम)



    दरोड्याची तयारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून जेरबंद केले आहे. ओंकार विठ्ठल रोडे (वय २५ वर्षे, रा.वाळूज ता गंगापुर जि. औरंगाबाद, हल्ली रा. चिकालसे ता.मावळ जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांना आरोपी कामशेत (जि. पुणे) परिसरात असल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला अटक केली. 

       शाबाज नवाब शेख (वय २६ वर्ष, रा.पंचपीरचावडी, अंबीका बँके शेजारी अहमदनगर)  यांचा २८ ऑगस्ट २०१८ रोजी मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरांनी दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता. शाबाज नवाब शेख यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा केल्यापासून ओंकार विठ्ठल रोडे हा फरार झाला होता. दि.३ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, फरार आरोपी ओंकार रोडे हा कामशेत येथे आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी आरोपीला कामशेत परिसरातून कामशेत पोलीसांच्या मदतीने पकडले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी दरोडाच्या तयारीत असलेल्या आरोपींवर केलेल्या कारवाईमध्ये हा आरोपी काही महिन्यांपासून फरार होता.


पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोसई मनोज कचरे, पोसई सुखदेव दुर्ग पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, ईस्त्राईल पठाण, अमोल गाडे, सुजय हिवाळे कामशेत पोलीस स्टेशनचे राजेंद्र पाटील स्थानिक गुन्हे शाखा नगर चे विश्वास बेरड आणि कामशेत पोलीस स्टेशन चे राजेंद्र पाटील प्रसाद निंबाळकर यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत