राहुरी(वेबटीम) सकल हिंदु समाज, राहुरी यांचेवतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले असून सदर मोर्चामध्ये १० से १५ हजार हिंदू जनसमुदाय हजर रा...
राहुरी(वेबटीम)
सकल हिंदु समाज, राहुरी यांचेवतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले असून सदर मोर्चामध्ये १० से १५ हजार हिंदू जनसमुदाय हजर राहण्याची शक्यता असून सदर मोर्चा बाय.सी.एम. मैदान येथून सुरू होवुन शुक्लेश्वर चांक, शिवाजी चौक, शनि चौक मार्गे पृथ्वी कॉर्नर येथे येथून सदर ठिकाणी सभेने सांगता होणार आहे. वाय. सी. एम मैदान है नगर - महामार्गालगत मोठया प्रमाणात गर्दी जमा होणार असून
अहमदनगर मनमाड महामागांवर वाहतुक कोंडी होण्याची तसेच सदर मनमाड महामार्गालगत असुन मोर्चाकरीता येणारे वाहने महामार्गालगत पार्किंग होणार आहेत. त्यामुळे अहमदनगर - मनमाड महामार्गावरील वाहनांचा मोर्चामधील नागरीकांना धक्का लागून अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे सदर मोर्चाची सांगता झाल्यानंतर परत जाणारे मोर्चेकरी व त्यांचे वाहनांमुळे मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होणार आहे. त्यामुळे मोर्चाचे कालावधीत अहमदनगर - मनमाड महानागांवरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.
अहमदनगर शिर्डी/ मनमाड महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक ०५ ऑगस्ट रोजी रोजीचे ०९.०० वा. ते १५.०० वा. पावेतो खालील पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जारी केले आहे.
*अहमदनगरकडुन राहुरीमार्गे शिडी / मनमाडकडे जाणारे अवजड वाहनांकरीता पर्यायी मार्ग*
अहमदनगर- विळद बायपास दुध डेअरी चौक शेंडी बायपास - नेवासा श्रीरामपुर बाभळेश्वर मार्गे शिर्डी / मनमाड
अहमदनगरकडून राहुरीमार्गे शिडी / मनमाडकडे जाणारे हलक्या वाहनांकरीता पर्यायी मार्ग - शिंगणापुर फाटा सोनई घोडगाव- नेवासा श्रीरामपुर बाभळेश्वर मार्गे शिडी / मनमाड
शिर्डी / मनमाडकडुन राहुरी मार्गे अहमदनगर कडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांकरीता पर्यायी मार्ग- शिडी / मनमाड- बाभळेश्वर श्रीरामपुर नेवासा मार्गे अहमदनगर
सदर आदेश मोर्चाकरीता येणारी वाहने, शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत