राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील २१ वर्षीय विद्यार्थीनीवर वेळोवेळी शिर्डीतील हॉटेलमध्ये शारीरिक अत्याचार करून तू...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील २१ वर्षीय विद्यार्थीनीवर वेळोवेळी शिर्डीतील हॉटेलमध्ये शारीरिक अत्याचार करून तू जर माझ्याशी बोलणे बंद केले तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील एकास राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
याबाबत २१ वर्षीय तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हंटले की,कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील अतिक पठाण याने तरी सन जुन 2022 फिर्यादीशी मैत्री करून तिचे सोबत प्रेमसंबंध केले. त्यानंतर ऑक्टोंबर 2022 मध्ये फिर्यादीस शिर्डी येथील एका हॉटेलमच्या रुममध्ये घेवुन जावुन तेथे स्वता आत्महत्या करण्याची धमकी देवून फिर्यादीचे इच्छेविरुध्द शारीरीक संबंध केले आहे. त्यानंतर फिर्यादी होने आरोपीशी बोलणे बंद केल्याने त्याने फिर्यादीस व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याशी बोलायला लावले व दि.४ ऑगस्ट 2023 रोजी रात्री १२.३० वाजता अतिक पठाण हा फिर्यादी मुलीच्या घरासमोर आला असता फिर्यादीची आईने तु आमचे घरी कशासाठी आला आहे, तु माझ्या मुलीला का त्रास देतो अशी विचारणा केली असता आरोपी पळुन गेला आहे.
दरम्यान याबाबत सदर पीडित तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील अतिक पठाण याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६,३५४ (₹), ३६४ (क), ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत