राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करत तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्य...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करत तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी वांबोरी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, शहानवाज आसिफ शेख(रा.वांबोरी) याने ऑक्टोबर 2022 साली दिवाळी सणाचे चार दिवसानंतर पासुन ९ जुलै पर्यंत पीडित अल्पवयीन तरुणीसोबत बळजबरीने चुंबन घेवु लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्याच्या मोबाईलमध्यसोबत सेल्फी फोटो काढून तु खुप आवडते माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु जर मला नेहमी भेटायला आली नाही तर तुझ्याबरोबर काढलेले सेल्फी फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. आरोपी शहणवाज याने पीडित मुलीस भेट म्हणुन दिलेले घड्याळ तिच्याकडुन फुटल्याचा राग आल्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करून त्याने पीडित अल्पवयीन तरुणी तसेच इतर अनेक मुलींसोबत देखील सेल्फी फोटो घेतले असुन तु जर मला भेटायला आली नाही तर तुझे व इतर सर्व मुलींचे फोटो व्हायरल करून सर्व मुलींची बदनामी करेल अशी धमकी दिली.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहानवाज आसिफ शेख(रा.वांबोरी) याच्यविरुद्ध भादंवि कलम 354,354 (ड), 506, पोक्सो का.8, 12 अ. जा.ज.का. क.3 (1) आर. 3 (1) (w) (1) = प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे करत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत