राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरातील १९ वर्षीय तरुणीच्या अंगावरील शर्ट फाडून लज्जा उत्त्पन्न होईल असे वर्तन करून तिच्या भ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरातील १९ वर्षीय तरुणीच्या अंगावरील शर्ट फाडून लज्जा उत्त्पन्न होईल असे वर्तन करून तिच्या भाऊ-भावजयला मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर १९ वर्षीय तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, रहीम मुन्ना शेख, अरबीना रहीम शेख( दोन्ही रा.मोमीन आखाडा, राहुरी) पीडित तरुणीच्या घरासमोर येऊन तिच्या भावाला काहीएक कारण नसताना रहीम शेख याने शिवीगाळ करून त्यास लाथबक्याने मारहाण केली.त्यावेळी पीडित तरुणी व तिची वहिनी सोडवण्यासाठी गेली असता रहीम शेख व अरबिना शेख यांनी लाथाबक्याने मारहाण करून पीडित तरुणीच्या अंगावरील टी शर्ट फाडून तीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत सदर पीडित तरुणीने राहुरी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून रहीम मुन्ना शेख, अरबीना रहीम शेख( दोन्ही रा.मोमीन आखाडा, राहुरी) यांच्यावर भादवी 354,323,427,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत