सात्रळ(वेबटीम) विद्यार्थी -विद्यार्थिनींनी स्वतःचे करियर घडविण्यासाठी कठोर मेहनत, चिकाटी व स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे तसेच विध्यार्थी...
सात्रळ(वेबटीम)
विद्यार्थी -विद्यार्थिनींनी स्वतःचे करियर घडविण्यासाठी कठोर मेहनत, चिकाटी व स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे तसेच विध्यार्थी दशेत सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन राहूरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले.
सात्रळ येथील रयत संकुलातील ना. स. कडू पाटील विद्यालय तसेच कोंडाबाई ना. कडू पा. कन्या शाळेतील विध्यार्थी विद्यार्थिनींना ते मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज कडू होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पो. नि. धनंजय जाधव यांनी देशातील लोकशाही, कायद्याचे राज्य, कायद्यातील अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसाची जवाबदारी, कायद्यातील तरतुदी, विध्यार्थी करियर, किशोरवयीन मुलांकडून होणारे अपराध व त्याचे भविष्यातील परिणाम, मुलींना फसवून, पळून नेणे कलम 363नुसार शिक्षा,लैंगिक अत्याचार कलम 376 व पॉक्सो अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्हा प्रतिबंध, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नोकरीसाठी तसेच पासपोर्ट मिळण्यासाठी गरजेचे असणारे चारित्र्य प्रमाणपत्र न मिळणे व त्यापायी नोकरी पासून वंचित राहण्याची वेळ येणे, स्वतःच्या आई वडिलांचा, गुरुजनांचा आदर ठेवणे असे बहुमूल्य तसेच सविस्तर मार्गदर्शन तसेच सोशल मीडिया वापर बाबत समुपदेशन केले.
या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या एस. आर. थोरात मॅडम, कन्या शाळेच्या प्राचार्या अ. व्ही. निभे मॅडम, पत्रकार संभाजी कडू, पत्रकार सुनील सात्रळकर, पत्रकार शकुरभाई तांबोळी, पोलीस विभागाचे सोमनाथ जायभाय, कोकाटे , शिक्षक वृंद, विधार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्तिथ होते. कार्यक्रमनंतर खेळीमिळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या कायदा विषयी प्रश्नांना पो. नि. धनंजय जाधव माहितीपूर्ण उत्तरे दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विलास गबाले यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पंकज कडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत