विद्यार्थी मित्रांनो मोबाईल व सोशल मीडिया पासून दूर रहा- पोनि धंनजय जाधव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विद्यार्थी मित्रांनो मोबाईल व सोशल मीडिया पासून दूर रहा- पोनि धंनजय जाधव

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)  विद्यार्थी दशेत असणाऱ्या सर्व मुला मुलांनी मोबाईल फोन व त्यात असणाऱ्या सोशल मीडिया पासून दूर राहावे, आपले शिक्षण...

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) 



विद्यार्थी दशेत असणाऱ्या सर्व मुला मुलांनी मोबाईल फोन व त्यात असणाऱ्या सोशल मीडिया पासून दूर राहावे, आपले शिक्षण, आपले करियर यावर लक्ष देऊन जीवनात यशस्वी करावे असे अवाहन राहूरी स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धंनजय जाधव यांनी केले आहे.

     गेल्या काही दिवसापासून राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे, निघून जाण्याचे प्रमाण वाढल्याने व त्यामुळे साहजिकच लैंगिक अत्याचार आणि पोक्सो सारख्या घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी शालेय विध्यार्थांशी सवांद साधून त्यांना सूचना देण्यासाठी देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयतील विदयार्थी मुला मुलींशी जाधव यांनी सवांद साधला.

   प्रचार्य कडूस यांचे अध्यक्षते खाली झालेल्या कार्यक्रमात, शिक्षक, पोलीस कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

       पोनि जाधव यांनी या वेळी विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःचा इतंभूत जीवन प्रवास उलगडून  सांगितला. जिद्द, चिकाटी व शिस्त ज्याचेकडे असेल तो विद्यार्थी कितीही प्रतिकूल परस्थितीवर मात करतो व जीवनात यशस्वी होतो हे सांगतानांच या देशातील कायदे हे आपण बनवले त्याचे पालन करणे आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. पोलीसाविषयी मनात भीती बाळगू नये. पोलीस हा कायद्याची अमलबजावनी करून देशातील नागरिकांच्या मालमता व जीविताचे रक्षण करतो.

   विद्यार्थी मित्रांनी मोबाईलच्या फसव्या दुनिये पासून स्वतःला दूर ठेवावे, देशाचे सर्व राष्ट्र पुरुष आपला आदर्श आहेत,त्यांचे विचारावर आपण चालतो, त्यांचे योगदान विसरू नका. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्र पुरुषांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई केली जाते. अनोळखी लोकांशी मैत्री करणे टाळावे, आपली आई-वडील, आपला भाऊ बहीण या पेक्षा चांगला मित्र कुणी नसतो. जे आई वडील जीवापाड प्रेम करून आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न करतात त्यांना अपमानित करू नका. त्यांना समाजात मान खाली घालवी लागेल असे कृत्य करू नका. विशेषतः मुलींनी या बाबत अत्यंत सावध राहावे असे अवाहन त्यांनी केले.

     प्रचार्य पी.डी. कडूस यांनी सर्व स्टाफ व विदयार्थी यांचे वतीने आपण दिलेल्या सूचनाचे पालन करू व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली. विद्यालयाचे वतीने पोनि धंनजय जाधव व पोलीस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

       यावेळी साहायक फौजदार आहेर,पोलीस कर्मचारी प्रमोद ढाकणे,जालिंदर साखरे,उप प्राचार्य आल्हाट सर, पर्यवेक्षक काळे सर सर्व शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.गणेश भांड यांनी सूत्रसंचलन केले तर प्रा.रायते सर यांनी आभार मानले.

   

कोणत्याही विदयार्थिनीला कुणी त्रास देत असेल तर त्यांनी शाळेतील तक्रार पेटीत आपली तक्रार टाकावी अथवा माझ्या मोबाईल वर थेट संपर्क साधवा.गैरवर्तन करणाऱ्या टार्गटाची गय केली जाणार नाही असा विश्वास पोनि जाधव यांनी विद्यार्थिनींना दिला.विदयार्थिनींनी याचे जोरदार टाळ्या वाजवत समर्थन दिले.




    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत