ताहाराबाद (वार्ताहर) श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष व कानडगावचे भूमिपुत्र नाना महाराज गागरे यांची अहमदनगर जिल्हा...
ताहाराबाद (वार्ताहर)
श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष व कानडगावचे भूमिपुत्र नाना महाराज गागरे यांची अहमदनगर जिल्हास्तरीय ‘वृद्ध कलावंत मानधन' समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धनश्री विखे यांच्या हस्ते समारंभ कानडगाव येथे सन्मान संपन्न झाला
कानडगाव ग्रामस्थांच्यावतीने, विविध संस्थांच्यावतीने व पंचक्रोशीच्यावतीने नाना महाराज गागरे व विखे परिवारातील प्रतिनिधी म्हणून धनश्रीताई विखे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विखे परिवाराकडूनही धनश्री विखे यांच्यस हस्ते गागरे महाराजांचा सन्मान करण्यात आला. तर गागरे महाराजांच्या परिवाराकडूनही धनश्रीताईचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब गागरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात गागरे म्हणाले, विखे परिवारामुळे आमच्या गावाला मोठी संधी मिळाली आहे. त्या संधीचं निश्चितच गागरे महाराज सोनं करतील व वृद्ध कलावंतांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर ताहाराबाद येथील माजी सरपंच नारायणराव झावरे म्हणाले, संत कवी महिपती महाराजांच्या सेवेचा हा मेवा म्हणून गागरे महाराजांना मिळाला आहे. तारुण्यातील ३०ते३५ वर्षे गागरे महाराजांनी प्रपंचावर तुळशी पत्र ठेवून वारकरी सांप्रदायाला दिली आहे. गागरे महाराजांनी महिपती महाराजांची एकनिष्ठ सेवा केली व करत आहे. म्हणूनच कामाची पावती म्हणून त्यांना हे पद मिळाले आहे. गागरे महाराज निश्चितच वारकरी सांप्रदायाला व वृद्ध कलावंतांना न्याय देतील,अशी अपेक्षा झावरे यांनी व्यक्त केली.
सत्कारमूर्ती नाना महाराज गागरे म्हणाले, संत कवी महिपती महाराजांच्या कृपेने व विखे परिवाराच्या प्रेमाने माझ्या खांद्यांवर अध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे. संत कवी महिपती महाराज मला शक्ती व बुद्धी देईल, त्याप्रमाणे वृद्ध कलावंतांना न्याय देण्याचं काम मी करेल. विखे परिवाराच्या विश्वासाला सार्थ ठरेल व सर्व घटकांना सामावून योग्य तो न्याय देण्याचे काम मी करील. वृद्धापकाळात कलावंतांना आधार म्हणून मानधन मिळते. त्या मानधनात सातत्य व वाढ होण्यासाठी मी प्रयत्नशील राहील व शासनाकडे त्याचा पाठपुरावा करेल, असे गागरे महाराज म्हणाले.
रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे म्हणाल्या, गागरे महाराजांवर विखे परिवाराचे प्रेम आहेच, परंतु संत कवी महिपती महाराजांचीही कृपादृष्टी आहे. त्यामुळेच महाराजांवर मोठी जबाबदारी पडली आहे. वारकरी सांप्रदायाबरोबरच इतर घटकांनाही महाराज योग्य न्याय देतील. गागरे परिवाराचे, कानडगाव ग्रामस्थांचे व पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून प्रत्येक गावातील महिला सक्षमीकरण व्हावे, भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी भावी पिढीवर व लहान मुलांवर योग्य ते संस्कार व्हावे. संस्कारातून विचार प्रणाली घडते. लहान मुलांना मोबाईलचा वापर जास्त करू देऊ नका, असे आवाहन धनश्रीताईंनी केले.आपल्या पूर्वजांनी व महाराजांनी समाजासाठी योगदान दिले आहे. समाज घडवण्याचे काम महाराज मंडळी करत असते. आपल्या संस्कृतीचे रक्षण व जतन वारकरी सांप्रदायाने केले आहे. त्याची उतराई म्हणून शासनाने त्यांना वृद्धापकाळात आधार म्हणून मानधन चालू केले आहे. नगर जिल्ह्याची जबाबदारी गागरे महाराजांवर आहे, ती जबाबदारी महाराज यशस्वीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त करून भावी कार्यास धनश्रीताईंनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अण्णा महाराज लोंढे, सिताराम महाराज गागरे, मनोज गव्हाणे, पत्रकार शिवाजी झावरे, शरद किनकर,भानुदास वाबळे, वैभव झावरे,सोपानराव गागरे, विशाल लोंढे, दिनकर घोरपडे, सदाशिव घोरपडे, भीमराज हारदे, सर्जेराव घाडगे, दिपक वाबळे, आप्पासाहेब नेहे, बाबुराव हारदे, चंद्रभान गागरे, पाटीलसाहेब गागरे, सुभाष लोंढे, रावसाहेब गागरे, हौशीराम गागरे, मधुकर सिनारे, बाळासाहेब गागरे, प्रदीप दिघे, महेश लोंढे, अशोक पोंदे, राजेंद्र गागरे, मानुबाई सय्यद व कानडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला व गागरे महाराजांवर प्रेम करणारे वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपसरपंच मधुकर गागरे यांनी केले तर आभार अण्णा महाराज गागरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत