राहुरी(गोविंद फुणगे) भारत हा जगातला पहिला असा देश आहे की, चंद्रावरील दक्षिण धुव्रावर "चंद्रयान" यशस्वीपणे पोहोचले आहे. त्याम...
राहुरी(गोविंद फुणगे)
भारत हा जगातला पहिला असा देश आहे की, चंद्रावरील दक्षिण धुव्रावर "चंद्रयान" यशस्वीपणे पोहोचले आहे. त्यामधे आपल्या शास्त्रज्ञांचा मोठा त्याग आणि सातत्य असल्यानेच हा विक्रम शक्य होऊ शकला म्हणून हि बाब आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प.महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले. ते वळण येथील सप्ताहात काल्याच्या किर्तनात बोलत होते.
वळण (ता.राहुरी) येथे वै. बन्सी महाराज तांबे, वै.भानुदास महाराज गायके यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्रीहरी महाराज वाकचौरे यांच्या कुशल मार्गदर्शनाने ४९ वा श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा आज श्री.संत तुकाराम महाराज संस्थान नेवासाचे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. महाराज पुढे म्हणाले की, वळण गावाची ४९ वर्षीपासून सुरू केलेली हि धार्मिक परंपरा अखंडितपणे सुरू आहे म्हणजे यासाठी थोरामोठ्यांचा त्याग, सातत्य आहे. हे कार्य असेच पुढे घेऊन जावे यासाठी तरूणांचा सहभाग हि तितकाच महत्वाच आहे. त्यामुळे धार्मिक परंपरा जोपासा. आपण आहे त्या ठिकाणी प्रामाणिक सेवा करणं म्हणजेच इश्वरसेवा होय जसे की, समाजसेवा, आई-वडिलांची सेवा, संताची सेवा, गुरूंची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, राष्ट्रसेवा करणे म्हणजेच इश्वर सेवा होय.त्यामुळे सेवा करणे हेच ईश्वर सेवा केल्या सारखे असल्याचे महारांनी म्हटले आहे.
या सप्ताह काळात दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, किर्तन व नंतर महाप्रसाद अशी दैनंदिन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दहीहंडी फोडून या कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनंतर भावनिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी हजारो भाविंकांची दैनंदिन उपस्थिती होती.
धर्म रक्षणाचे काम तरुणांनी हाती घेतले पाहिजे
गावोगावी जाऊन तरुणांनी धर्म रक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जर कीर्तनातून कोणी बाबा धर्माचे विटंबन करेल आणि करमणूक करेल तर बाबाला कीर्तनासाठी बोलू नये असे आवाहन ह.भ.प. मंडलिक यांनी केले. कीर्तनातून करमणूक आणि हसवणूक करणाऱ्या महाराज मंडळींना उद्धव महाराज मंडलिक यांनी चांगलाच टोला लगावला आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत