नगर(प्रतिनिधी) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल फिरोज शेख (वय २६ वर्...
नगर(प्रतिनिधी)
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल फिरोज शेख (वय २६ वर्षे, रा.केडगाव,अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तपास पथकाने आरोपीला दि.२२ ऑगस्ट २०२३ रोजी केडगाव परिसरातून अटक केली.
केडगाव परिसरात दि.१२ जुन २०२३ रोजी राहुल प्रल्हाद शेळके (वय २४ वर्षे रा. केडगाव, अहमदनगर) यांना दोन आरोपींनी धारदार शस्त्राने कानावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा केल्यापासून आरोपी चांद पठाण, सोहेल शेख हे दोघे फरार झाले होते. यातील आरोपी सोहेल फिरोज शेख हा केडगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केडगाव भागात सापळा लावून आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीसअधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे,पोलीस अंमलदार शाहिद शेख, रविंद्र टकले, मोहन भेटे, नकुल टिपरे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले यांनी ही कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत