देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कर्मचारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कर्मचारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

देवळाली प्रवरा(वेबटीम)   राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपरिषद कर्मचारी अरुण कदम यांच्या मोटारसायकलला बिबट्याने धडक देऊन हल्ला के...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपरिषद कर्मचारी अरुण कदम यांच्या मोटारसायकलला बिबट्याने धडक देऊन हल्ला केला असून यात  नगरपरिषद कर्मचारी कदम हे जखमी झाले आहेत.कदम यांचा हात फ्रॅक्चर तर पायाला मार लागला आहे.


 देवळाली नगरपरिषद कर्मचारी अरुण कदम हे देवळाली प्रवरा शहरातून कदम वस्ती येथे आपल्या घरी रात्री ८ वाजेच्या सुमारास जात असताना  एक बिबट्या कदम यांच्या दुचाकीला आडवा गेला तर दुसऱ्या बिबट्याने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत कदम हे जागेवर खाली पडले. या घटनेत त्यांचा हात फ्रॅक्चर झाला तर पायाला मार लागला असून बिबट्याने नख्या ओरखडल्या आहेत. त्यांच्यावर राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिग होम येथे उपचार करण्यात आले.


दरम्यान देवळाली प्रवरा येथील कदम वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते या भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याची संख्या जास्त असण्याची शक्यता असल्याने वनविभागाने दखल देऊन तातडीने पिंजरे बसवावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत