राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाळासाहेब रंगनाथ वाणी यांच्या द्वितीय पुण्यस्म...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाळासाहेब रंगनाथ वाणी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार १ सप्टेंबर २०२३ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था येथे सकाळी ९ वाजता श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन वाणीभुषण ज्ञानेश्वर महाराज तांबे(जेऊर हैबती, ता.नेवासा) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तदनंतर ९.३० वाजता तांबे महाराज कीर्तन व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास पालक, परिसरातील नागरिक व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था, श्री.बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कुल व ज्युनिअर कॉलेज, सरस्वती वाणी कॉलेज ऑफ बी फार्मसी, वाणी कॉलेज ऑफ फार्मसी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत