भावी नगरसेवकांच स्वप्न भंगल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भावी नगरसेवकांच स्वप्न भंगल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर

  मुंबई(वेबटीम) अनेक इच्छुकांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागल्या आहेत. परत्नू आता या इच्छुकांच्या पुन्हा एकदा अपेक्ष...

 मुंबई(वेबटीम)



अनेक इच्छुकांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागल्या आहेत. परत्नू आता या इच्छुकांच्या पुन्हा एकदा अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत दाखल केलेल्या याचिकांवर होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.



सदर याचिकांवर १ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि ओबीसी आरक्षण ही दोन्ही प्रकरणे उच्च न्यायालयात आहेत. याबाबत ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटची सुनावणी झाली होती. आता यावर उद्या अर्थात १ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल असे वाटत होते.



परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह राज्यातील १५ महानगरपालिका, ९२ नगरपालिकांचे भवितव्य टांगणीला लागण्याचे बोलले जात आहे. आता या दोन्ही याचिकांवर २२ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत