राहुरी(वेबटीम) नगर-मनमाड महामार्गावर कांदा निर्यात शुल्क धोरणाविरोधात रास्ता रोको करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह इतरांवर पोलीसात ...
राहुरी(वेबटीम)
नगर-मनमाड महामार्गावर कांदा निर्यात शुल्क धोरणाविरोधात रास्ता रोको करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह इतरांवर पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्ह्याधिका-यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे, रहदारीस अडथळा निर्माण करून जनसामान्यांची गैरसोय करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि पोलीस अधिका-याने दिलेल्या सुचना न मानने आदि कलमान्वये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरेंसह ३० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब रोहकले यांच्या फिर्यादीवरून रवींद्र बांपुसाहेब मोरे, बाबासाहेब सोमा जाधव, प्रकाश बाबासाहेब देठे, जुगल किशोर गोसावी, कृष्णा नानासाहेब मुसमाडे, दिपक तनपुरे, पिंटूनाना साळवे आप्पासाहेब ढुस आदिंसह इतर २०-२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत