राहुरी शहरातील नेतृत्वावर नाराजी; थेट बुऱ्हाणनगरमध्ये कुजबुज! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरातील नेतृत्वावर नाराजी; थेट बुऱ्हाणनगरमध्ये कुजबुज!

 राहुरी : वेबटीम  -     एकीकड़े राहुरीत कोट्यवधीच्या विकासकामांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असली तरी फ्लेक्स बोर्डवरील फोटोवरून शहरातील...

 राहुरी : वेबटीम  -

 

  एकीकड़े राहुरीत कोट्यवधीच्या विकासकामांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असली तरी फ्लेक्स बोर्डवरील फोटोवरून शहरातील नेतृत्वावरच काही कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून येताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज सकाळी बुऱ्हाणगर येथे जाऊन काही कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केल्याची माहिती मिळाली 

याबाबत समजलेली माहिती अशी की, भूमिगत गटार योजनेचा रविवारी शुभारंभ होत आहे, मात्र या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डवर शहराध्यक्ष यांचा फोटो नाही, तसेच काही प्राजक्त तनपुरे समर्थकांनाही शहरातील श्रेष्ठीकडून जवळ केले जात असल्याची काही कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळे याबाबत काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, काल साहेबांच्या ऑफिसमध्ये यावर काथ्याकूट झाला, तर शनिवारी सकाळी  काही कार्यकर्ते थेट बुऱ्हाणनगरला गेले होते, असेही समजते. तिथे राहुरीत सुरू असलेले राजकारण साहेबांच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न झाला, यात प्रवरा व बुऱ्हाणनगरचे नेतृत्व मान्य करणारे कार्यकर्ते होते, तर शहरातील नेतृत्व मान्य नसल्याची भावना तिथे व्यक्त केल्याचे समजले. काहींनी आम्ही पत्रिका वाटल्या नसल्याचेही सांगितले. यावर साहेबांकडून या विषयावर संबंधितांशी समक्ष चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्याचेही वृत्त आहे.  दरम्यान, ही नाराजी फ्लेक्स बोर्डवरून आहे की मध्यंतरी झालेल्या काम वाटपातून, याविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीची झालरही या नाराजीला लागली असल्याचे बोलले जाते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत