श्रीरामपूर(वेबटीम) देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सीमेवरील सैनिकां...
श्रीरामपूर(वेबटीम)
देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सीमेवरील सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या श्रीरामपूर भाजप महिला आघाडी शहराधक्ष्या पूजा चव्हाण यांनी १००० राख्या खा.सुजय विखे यांच्या हस्ते सीमेवरील जवानांना पाठविल्या आहेत.
श्रीरामपूर शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात खा.सुजय विखे यांच्या उपस्थितीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या शिर्डी दौऱ्याबाबत भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत श्रीरामपूर शहर भाजप महिला आघाडी अध्यक्षा पूजा चव्हाण यांनी सीमेवरील सैनिकांसाठी १००० राख्या खा.विखे यांच्या हस्ते पाठविल्या आहेत. पुजा चव्हाण दरवर्षी हा उपक्रम राबवित असतात त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे खा. विखे यांनी कौतुक करत सैनिकांबद्दल प्रेम व संवेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात असायला हवी. देशवासीयांनी त्यांच्याबरोबर साजऱ्या केलेल्या अशा सणांमधून सैनिकांना बळ मिळणार असल्याचे म्हंटले आहे.
यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी,भाजप श्रीरामपूर विधानसभा प्रमुख नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुका उपाध्यक्ष शंकर मुठे, नानासाहेब पवार , तालुका महिला अध्यक्षा मंजुषा ढोकचौळे, रेखाताई रिंगे, विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा संघटक सपना थेटे,पुष्पा हरदास, सौ. शर्मा , सौ .धुमाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत