पानेगांव (वेबटीम) शुक्रवार रात्री ७:३० दरम्यान सुरु झालेल्या पाऊसाने नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मु...
पानेगांव (वेबटीम)
शुक्रवार रात्री ७:३० दरम्यान सुरु झालेल्या पाऊसाने नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरात ढगफुटी सदृश परिस्थितीने ओढे-नाले ओसंडून वाहू लागले असून खेडलेपरमानंद- सोनई लेंडगा ओढ्यावर सुरु असलेल्या नवीन पुलाचं काम येथील जूना पुलाबरोबरचं नवीन पुलाच्या कामाचे साहित्य अचानक झालेल्या पाऊसाने वाहून गेले. तेथील वाहतूक मार्ग ठप्प झाला आहे. सोनई कडे जाणारे विद्यार्थी,कारखाना कर्मचारी यांना सोनई कडे जाण्यासाठी मोठी कसरतीचा सामना करावा लागला.करजगांव देवखिळे वस्ती मार्ग काही वेळ बंद होता.
जवळपास पाऊसाळा सुरु झाल्यापासून पहिला पाऊस झालेला असून कपाशी, सोयाबीन,मका,कांदा रोपे,ऊस,घास,मका,आदी पिकं रात्र -दिवस पाणी भरुन कशी बशी पिकं बळिराजाने उभी केली आहेत.ती हि आज पाण्यात गेली आहे. खेडलेपरमानंद,शिरेगांव,पानेगांव,करजगांव अंमळनेर वाटापूर, येथील ओढाच्या कडेला असणारे शेतकऱ्यांचे पिकं धोक्यात आले असून या बाबत महसूल कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी पानेगांवचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप, उपसरपंच रामराजे जंगले, सुभाष गुडधे, डॉ काकडे,माजी सरपंच रघूनाथ जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले राजेंद्र जंगले, भारत जंगले,शिरेगांवचे लोकनियुक्त सरपंच निरंजन तुवर, उपसरपंच भगिरथ जाधव, दिगंबर जाधव,परमानंद जाधव,किरण जाधव, संदिप जाधव करजगांवचे सरपंच अशोक टेमक, चंद्रकांत टेमक, सुहास टेमक,सतिश फुलसौंदर,संजय कंक, अंमळनेर लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर, चंद्रकांत माकोणे, अच्युत घावटे,वाटापूरचे अॅड पांडूरंग माकोणे,विनायक माकोणे,भिकाजी जगताप,कर्णासाहेब औटी यांनी केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
देवनदीला आलेल्या पाण्याने मुळानदी पहिल्यांदाच वाहती झाली असल्याने शेतकऱ्यांन मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुळाथडी परीसरात अचानक झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांनी रात्र दिवस जागून पिकं उभी केली. त्याच बरोबर कपाशी वेचणी साठी आलेली असून प्रचंड नुकसान झालेले असून या सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेवून आमदार शंकरराव गडाख पाटील,सुनिल गडाख यांना भेटून नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी या बाबत विचार विनिमय करू- संजय जंगले -लोकनियुक्त सरपंच पानेगांव
मुळाथडी परीसरात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश परिस्थितीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकटपणे हेक्टरी ५०हजार रुपयांची मदत शिंदे सरकारने करावी - महिला शेतकरी सौ. दिपाली नवगिरे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत