तुळापूर(चैताली हारदे) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनाने...
तुळापूर(चैताली हारदे)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनाने श्रावण मासानिमित्त राहुरी तालुक्यातील कणगर येथील बुबळेश्वर देवस्थान भेटे नऊशे श्लोकी संक्षिप्त श्री नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
श्री क्षेत्र बुबळेश्वर साक्षात गुरु गोरक्षनाथ यांची गुरु मच्छिंद्रनाथ यांच्याकडे वडे खाण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी ब्राह्मण पत्नीला डोळा काढून दिला ते ठिकाण बुबळेश्वर तेथे आहे आजही गुरु गोरक्षनाथ यांच्या सानिध्याची प्रचिती श्री नवनाथ ग्रंथ पारायण यामध्ये आहे. याच पावनभूमीमध्ये 900 श्लोकी नवनाथ ग्रंथाचे पारायण आज सर्व सेवेकऱ्यांमार्फत झाले. यावेळी मोठ्या संख्यने महिला व भाविकांनी या पारायण सोहळ्यात सहभाग नोंदविला. महाप्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत