राहुरी फॅक्टरीतील तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत आज बुधवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत आज बुधवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत आयुर्वेद जनजागृती ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविदयालय व चिकित्सालय श्री शिवाजीनगर तर्फे युवा संघर्ष प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ,कारखाना कामगार वसाहत , व्हॉलीबॉल ग्राउंड शेजारी आज बुधवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ मोफत आरोग्य शिबिरा चे आयोजन केले आहे.


वैशिष्ट्ये:-


खालील प्रमाणे टेस्ट मोफत केल्या जातील :- 

१) रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी (गरजेनुसार )

२) पांढऱ्या पेशी (WBC)/ तांबड्या पेशी

ब्लड टेस्ट(गरजेनुसार )

३) ECG काढणे (गरजेनुसार)/ब्लड प्रेशर मोजणे.

४) रक्तातील शुगर टेस्ट (गरजेनुसार )

५) स्त्रियांचे आजार, मासिक पाळी संबंधी तक्रारी, गर्भिणी तपासणी, रक्त कमी असणे, गर्भाशयाचे आजार इत्यादीविकार निदान व मार्गदर्शन, उपचार .

६)डोळ्यांचे विविध आजार.

७)वाताचे विविध आजार, संधिवात, पाठदुखी, कंबरदुखी,गुडघेदुखी इ.

८)मूळव्याध, भगंदर, पोटाचे आजार, शरीरावरील गाठी, न भरणाऱ्या जखमा इ.

९)मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्त कमी असणे,स्थूलता  व थायरॉईड इ.संबंधी आजार.

१०)पंचकर्म चिकित्सा. इ.


(आयुर्वेदिक औषधे मोफत असतील.)


 गरजेनुसार पेशंटला आवश्यक त्या पुढील तपासण्यांबाबत मोफत मार्गदर्शन केले जाईल.


शिबीराच्या ठिकाणी खालील विषयांवर आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत तज्ञांचे व्याख्यान आयोजन केले आहे


१) स्थूलता व मधुमेह प्रतिबंध

२) गर्भिणी परिचर्या 

३) गुदगत विकार प्रतिबंध

४) दिनचर्या व ऋतुचर्या



पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा


*शिबीराचे ठिकाण*

 युवा संघर्ष प्रतिष्ठान

 गणेशोत्सव मंडळ,

राहुरी कारखाना कॉलनी, हॉलीबॉल ग्राऊंड शेजारी,

राहुरी फॅक्टरी 


दिनांक व वेळ

27/09/2023

सकाळी 11:30 वाजता 


*आयुर्वेदिक उपचार व आयुर्वेदिक औषधी पूर्णपणे मोफत करण्यात येतील.


*नियम व अटी लागू*


• शिबिरामध्ये नमूद केले व्यतिरिक्त कुठलीही तपासणी मोफत केली जाणार नाही

* शिबिरामधील रुग्णांना पंचकर्म उपचारासाठी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये यावे लागेल.

*पुढील तपासणी व उपचारांसाठी महाविद्यालयामध्ये यावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत