राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी येथील मुळा धरण पात्रानजीक राहुरी फॅक्टरी येथील एका विवाहित तरुणाची दुचाकी मिळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली सद...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी येथील मुळा धरण पात्रानजीक राहुरी फॅक्टरी येथील एका विवाहित तरुणाची दुचाकी मिळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली सदर तरुणाने धरणपात्रात उडी टाकली असल्याचा संशय आल्याने पोलीस प्रशासन, नातेवाईक व धरण परिसरात नागरिकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो विवाहित तरुण मिळून आला नाही. आज अखेर अहमदनगर येथे सदर तरुण मिळून आला असून मानसिक तणावात असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी मुळा धरण पात्रानजीक एक दुचाकी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सदर दुचाकी ट्रेस आउट केली असता ती राहुरी फॅक्टरी येथील अशोक उत्तम शेंडगे नामक व्यक्तीची असल्याचे समोर आले. त्यानुसार नातेवाईक व इतरांशी संपर्क केला असता तो घरगुती वादामुळे बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले. अशोक याने दुचाकी धरण पात्रानजीक लावून धरणात उडी घेतली असल्याचा संशय पोलीस व नातेवाईकांना आला त्यांनी त्यानुसार स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने सोमवार सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत धरण पात्रा परिसरात स्थानिक पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने शोध घेतला. मात्र सदर विवाहित तरुण मिळून आला नाही.
आज अखेर बेपत्ता अशोक शेंडगे अहमदनगर शहरात नातेवाईकांना मिळून आला असून त्याला राहुरी फॅक्टरी येथे आणण्यात आले असून तो मानसिक तणावात असल्याने त्याच्यावर राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अशोक सुखरूप परतला असला तरी मात्र त्याची दुचाकी धरणपात्र परिसरात मिळून आल्याने पोलीस प्रशासनाची काही काळ चांगलीच धावपळ उडून गेली होती, हे मात्र तितकंच खरं...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत