ताहाराबाद(अर्जुन पवार) राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील बेलकरवाडीचा जवानाचा गावातील तळ्यात बुडून शहीद झाले .ज्ञानेश्वर हे ९ मराठा लाईट इंफ...
ताहाराबाद(अर्जुन पवार)
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील बेलकरवाडीचा जवानाचा गावातील तळ्यात बुडून शहीद झाले .ज्ञानेश्वर हे ९ मराठा लाईट इंफंट्री दलात सेवेत हिमाचल प्रदेश मध्ये रुजू असताना अत्यंत वेदनादायी असा क्षण अहमदनगर जिल्ह्यातील बेलकरवाडी ग्रामस्थांनी आज अनुभवला.आज बेलकरवाडी गावात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सोमवारी ज्ञानेश्वर शहीद झाले. ही बातमी समजता आई-वडिल आणि भाऊ ,बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गावात शोककळा पसरली. ज्ञानेश्वरचे पार्थिव गावात दाखल झाले.ज्ञानेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक सकाळ पासून उपस्थित होते. वीर जवान अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ज्ञानेश्वर ढवळे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
सकाळी साडे नऊ सुमारास बेलकरवाडी या ज्ञानेश्वर यांच्या मुळगावी पार्थिव आणण्यात आले. त्यांच्या घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटूंबियांनी आक्रोश केला. अवघ्या २४ वर्षांच्या या जवानाचे अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर गावात अंतयात्रा काढण्यात आली. अंतिम यात्रा स्मशानभूमीत आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले.या ठिकाणी माहिती मा. नगराध्यक्षा उषाताई तनपुरे , जिल्हा परिषद माजीअध्यक्षा शालिनीताई विखे ,माजी आमदार शिवाजी कर्डीले,तहसिलदार चंद्रजित रजपूत पोलिस निरीक्षक धनंजय जाधव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहमदनगर सुभेदार गुंजाळ,वी.ल.कोरडे स्वाडर्न लीडर सह त्यांचे सर्व एम.आय.आर.सी.सैनिक दल त्याचप्रमाणे माजी सैनिक नामदेव वांढेकर , ताराचंद गागरे, पोलीस कर्मचारी तहसिल कर्मचारी, पत्रकार, पोलीस पाटील किरण उदावंत ग्रामसेवक एस टी पटेकर तलाठी विठ्ठल गवारी पंचक्रोशीतील ह.भ.प. सर्व किर्तनकार महंत आजी माजी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आजी माजी सेवा सोसायटी चे चेअरमन व्हा.चेअरमन व सर्व सदस्य पंचक्रोशीतील सर्व शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी समस्त ग्रामस्थ ताहाराबाद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी श्रद्धांजली वाहिली.
लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी भारत माता की जय....चा जयघोष झाला. शहिद जवान ज्ञानेश्वर ढवळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत