राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान सुट्टीसाठी बेलकरवाडी (ताहाराबाद) ता. राहुरी येथे गावी आला होता. संबंधित जवाना...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान सुट्टीसाठी बेलकरवाडी (ताहाराबाद) ता. राहुरी येथे गावी आला होता. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात रजिष्टरी नोंद घेण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (२३) असे मृत जवानाचे नाव आहे. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात आढळल्यानंतर त्यास राहुरी येथील ग्रामिण रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तोडमल यांनी तपासणीला येण्यापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित सैन्य दलातील जवान ज्ञानेश्वर ढवळे याच्या मृत्युप्रकरणी अकस्मात नोंद घेण्यात आली आहे. घटनेबाबतचा नेमका खुलासा झालेला नाही. त्यामुळे घटनेबाबत शंका कुशंका व्यक्त केली जात आहे.
पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस हवालदार नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे. घटनास्थळ पाहणी व सविस्तर चौकशी केल्यानंतरच घटनेचा उलगडा समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर दुसऱ्या घटनेत राहुरी फॅक्टरी येथील ३४ वर्षीय विवाहीत तरूणाने मुळा धरणाच्या पाण्यात उडी घेतल्याचा संशय नातेवाईकांना मिळाल्याने व त्यांनी तशी माहिती मिळाल्याने पो.नि.धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल तुळशिदास गीते व पोलीस पथकाने शोधकार्य सुरू केले.माञ त्याचा शोध लागला नसून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.
राहुरी फॅक्टरी परिसरातील ३४ वर्षीय तरुण सकाळीच आपल्या मोटारसायकलवर मुळा धरण परिसरात गेला होता. त्याची दुचाकी सदर ठिकाणी आढळून आली.घरगुती वादातून त्याने मुळा धरणाच्या पाण्यात उडी घेतली असल्याचा त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यामुळे सकाळ पासून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू होती.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत