राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथील ३३ वर्षीय तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी राहुरी...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथील ३३ वर्षीय तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संगमनेर येथील सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुकुल वसाहत येथील सुशांत केदारी हे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता वाणी मळा येथे जेवणासाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या शाम माणिक लोखंडे, यश शाम लोखंडे रा. संगमनेर व इतर दोन ते पाच अनोळखी इसमांनी येऊन सुशांत केदारी याच्या छातीवर, पोटावर,व उजव्या हाताच्या दंडावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली तर यश लोखंडे याने आपल्या हातातील लाकडी दांड्याने मानेवर मारहाण केली.
तसेच अनोळखी दोन ते पाच इसमांनी शिवीगाळ दमदाटी करत लाथा बुक्यांनी मारहाण करून पुन्हा संगमनेर येथे दिसला तर जिवे मारून टाकू अशी धमकी दिली.
दरम्यान जखमी सुशांत केदारी याच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल दिनकर गरजे हे करत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत