राहुरी(प्रतिनिधी) गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सु-व्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांना धाक व वचक आणि सर्व साम...
राहुरी(प्रतिनिधी)
गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सु-व्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांना धाक व वचक आणि सर्व सामान्य नागरिकांना विश्वास निर्माण व्हावा) या उद्देशाने रॅपिड ॲक्शन फोर्स (शीघ्र कृती दल) यांच्याकडून शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी राहुरी शहरासह उंबरे येथे रूट मार्च काढण्यात येणार आहे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
शुक्रवारी राहुरी पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च करण्यासाठी शिघ्र कृती दल पथक येणार असून पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १०.०० वाजता उंबरे गावातून त्यानंतर ११.०० वाजता राहुरी शहरातील YCM ग्राउंड- मल्हारवाडी चौक- शनी चौक- आझाद चौक- मठ गल्ली- आझाद चौक- शनी मंदीर- शिवाजी चौक- शुक्लेश्वर चौक याप्रमाणे शीघ्र कृती दलाचे पथ संचलन होणार असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत