देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील आंबी स्टोअर परिसरात असलेल्या अस्मिता रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन संचलित स्वर्गीय...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील आंबी स्टोअर परिसरात असलेल्या अस्मिता रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन संचलित स्वर्गीय विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शाळेत चिमुकल्या, बाल विद्यार्थ्यांच्या समवेत श्रीकृष्ण गोकुळ आष्टमिनीमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
चिमुकल्या बाल विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधा, गौळणी यांच्या आकर्षक वेशभूषा केल्याने स्कुलमध्ये गोकुळ अवतरले होते.
यावेळी बाल, गोपाळांनी, विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडल्या नंतर सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक भागवत पठारे, संचालक ज्ञानेश्वर पठारे सर व मुख्याध्यापिका पल्लवी पठारे मॅडम विद्यार्थी व पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रध्दा निद्रे, अंजली बेहळे, सोनाली पुंडकर, रेणुका शेटे, प्राजक्ता संसारे, प्रिया संसारे, संदीप चव्हाण, सारिका बागुल आदीं शिक्षकवृंदासह दत्तात्रय पठारे, भास्कर भालसिंग, सुनील हिंगे, बाळासाहेब गायकवाड, वंदना सरोदे आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. आभार ज्ञानेश्वर पठारे सर यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत