राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील साईराज प्रतिष्ठानच्यावतीने उद्या बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायं.६.०० वा. तनपुरे कारखाना म...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील साईराज प्रतिष्ठानच्यावतीने उद्या बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायं.६.०० वा. तनपुरे कारखाना मंगल कार्यालय पटांगणात दहिहंडी उत्सव संपन्न होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी साईराज प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा होत आहे.राहुरी येथील नामवंत पथक या दहीहंडी उत्साहात सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहे. या पथकास सत्यजित कदम फौंडेशन यांच्या वतीने २१,०००/- रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे आदिंसह परिसरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच साईराज प्रतिष्ठानला दहिहंडी उत्सवासाठी सहकार्य करणारे देणगीदार आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साईराज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत