राहुरी(प्रतिनिधी) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय आध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील अहमदनगर जिल्हयाती...
राहुरी(प्रतिनिधी)
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय आध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील अहमदनगर जिल्हयातील रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी बरखास्त असल्याचे रिपाईचे राज्याचे नेते व जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांतजी भालेराव राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे राज्य सचिव बाळासाहेब गायकवाड उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये पुढे म्हटले आहे की , अहमदनगर जिल्ह्यात वर्षानुवर्षे आंबेडकरी विचारांच्या व तळागाळात एकनिष्ठेने काम करणारे असंख्य कार्यकर्ते व महिला आहे प्रत्येकाला पक्षाच्या विविध पदावर काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी व नवीन प्रामाणिक चेहऱ्यांना पक्ष्यामध्ये काम करण्याची संधी मिळावी ही धारणा पक्षाची असल्याने २०२४ लोकसभा , विधानसभा व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील महिला आघाडी सक्षम करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने , संपर्क प्रमुख श्रीकांतजी भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे राज्य सचिव बाळासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सद्य स्थितीतील विद्यमान असणारी रिपब्लिकन महिला आघाडी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे ना. रामदास आठवले यांच्या आदेशाने लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेवून नविन महिला आघाडीची घोषणा होईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.
तसेच जिल्हाअध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिपाई पक्षाची वाटचाल सक्षमपणे चालू आहे . सध्याची राजकिय वाटचाल बघता महिला ह्या मोठ्या प्रमाणात संघटनेत काम करण्यास पुढे येत आहे . रिपाईच्या अनेक मोर्चा ,उपोषण, रस्ता रोको आंदोलन व राजकिय विविध कार्यक्रमात वर्षानुवर्ष महिला तन - मन - धनाने व नि:स्वार्थीपणे काम करताना दिसत आहे . महीला आघाडी सक्षम करण्यासाठी होतकरु व नविन महिलांना संघटनेत काम करण्याची संधी मिळावी या धोरणातून आता पक्षाची वाटचाल होणार असल्याने वर्षानुवर्ष त्याचं त्या महिलांना काम करणे शक्य होत नाही तेव्हा संघटनेत बदल होणे आवश्यक आहे . ही नेतृत्वाची इच्छा आहे त्यामुळे भविष्यात रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महिला आघाडी सक्षम होण्यावर भर असल्याने सध्याची रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी बरखास्त करण्यात आली आसून लवकरच जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे राज्य सचिव बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नविन आघाडीची घोषणा होणार असून जोपर्यंत रिपाईच्या जिल्ह्याच्या व तालुक्याच्या नवीन निवडी होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही महिलांनी आपल्या नावाच्या पुढे पक्ष्याचे पदाधिकारी म्हणून पद लावू नये व पक्ष्याचेही नाव लावू नये तसे गैर वर्तन आढळल्यास पक्षातून नियमाप्रमाणे निलंबन होऊन ' हकालपट्टी ' करण्यात येईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत