राहुरी (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षांतील सर्व मराठा समाजातील तरुणांनी आपल्य...
राहुरी (प्रतिनिधी)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षांतील सर्व मराठा समाजातील तरुणांनी आपल्या पदांचे सामुहीक राजीनामा देवुन या घटेनेचा निषेध करावा. आणि पूढाऱ्यांना वठणीवर आणावे. असे आवाहन सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे निलेश जगधने यांनी केले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे आंदोलकांवर लाठी हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी राहुरी येथील सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळणेसाठी उपोषणास बसले होते. त्यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू असताना पोलिस प्रशासनाने त्यांना उपोषणा पासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलन कर्ते व पोलिस प्रशासनात किरकोळ शाब्दीक वाद झाले. नंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला. तसेच अश्रू धूराचा वापर करुन हवेत अंदाधुंद गोळीबार केला. या लाठी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. सदर उपोषण कर्ते हे पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करीत असताना मराठा समाजाचे आंदोलन उधळून लावण्यासाठी जाणीवपूर्वक हा गोळीबार व लाठी हल्ला घडवून आणला.
या घटनेचा सत्य शोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या घटनेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. त्यांनी या घटनेची सर्वस्वी जबाबदारी घेऊन त्वरीत राजीनामा द्यावा. आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे. अन्यथा कोणत्याही क्षणी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी वंचित चे जिल्हा नेते निलेश जगधने, लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, जिल्हाध्यक्ष नंदु शिंदे, तालूकाध्यक्ष सतिष भांड, सतिष भांड, बाबाजी जगधने, दिपक आव्हाड, निलेश बाळासाहेब जगधने, प्रमोद ससाणे, फकीरा चंदनशीव, बाबासाहेब आडागळे, रवींद्र कांबळे, लक्ष्मण गायकवाड, संदिप जगधने, विलास जगधने, आकाश बोरूडे, दिपक जगधने, बाळासाहेब खरात, सुरेंद्र ताठे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत