राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे सामूहिक १०८ हनुमान चालीसा पठण मोठ्या उत्साहात सं...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे सामूहिक १०८ हनुमान चालीसा पठण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अबाल वृद्धांनी या सोहळ्यास भाविकांनी सहभाग घेतला.
प्रसादनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे दक्षिण मुखी हनुमान मित्र मंडळ व सकल हिंदू समाज, श्रीशिवाजीनगर यांच्या वतीने सामूहिक १०८ हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अतिशय भक्तिमय वातावरणात १८० पेक्षा जास्त वाचकांनी १०८ हनुमान चालीसा पठणात सहभाग घेतला होता.
यानिमित्ताने रा.स्व.संघाच्या धर्म जागरण गतिविधि मार्फत सामाजिक रक्षाबंधनाचा उत्सव बौद्धिक ह. भ. प. क्षीरसागर महाराज समवेत ह. भ. प. कुसमुडे महाराज व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्षिणमुखी हनुमान मित्र मंडळ, प्रसादनगर तसेच सकल हिंदू समाज श्री शिवाजीनगर यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत