देवळाली प्रवरा ते क्षेत्र खुलताबाद पायी दिंडीचे उद्या सोमवारी प्रस्थान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा ते क्षेत्र खुलताबाद पायी दिंडीचे उद्या सोमवारी प्रस्थान

देवळाली प्रवरा(वेबटीम) श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र खुलताबाद पायी दिंडी सोहळ्याच्या आयोजन सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी करण्यात...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र खुलताबाद पायी दिंडी सोहळ्याच्या आयोजन सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती श्री भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा संयोजक समितीने दिली आहे.

  

याबाबत माहिती अशी की गेली 18 वर्षापासून श्री भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र खुलताबाद याचे आयोजन केले जाते



यावर्षी देखील सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा येथील श्री मारुती मंदिर येथून या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी बेलापूर मार्गे वळदगाव वरून भोकर येथे हायस्कूलमध्ये या दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम होणार आहे मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी कमलपूर नेवरगाव फाटा मार्गे नेवरगाव जिल्हा परिषद शाळा येथे दुसरा मुक्काम असणार आहे बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी मांजरी देवी मंदिर मार्गे सिद्ध वाडगाव येथे जाऊन तिसरा मुक्काम होईल गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी नारळ फाटा गोळेगाव मार्गे डोणगाव हायस्कूल येथे तिसरा मुक्काम होणार आहे शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी वेरूळ फाटा मार्गे हा दिंडी सोहळा भद्रा मारुती भक्तनिवास येथे पोहोचणार असून भद्रा मारुतीचे दर्शन करून व शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाआरती करून दिंडी सोहळ्यातील भाविक परत देवळाली प्रवरा येथे पोहोचणार आहेत या दिंडी सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी सकाळचा चहा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण देऊन अन्नदान केले आहे.


या दिंडी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा संयोजक समिती देवळाली प्रवरा यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत