मराठा समाजावरती झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ भेंडा येथे निषेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मराठा समाजावरती झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ भेंडा येथे निषेध

नेवासा प्रतिनिधी जालना येथील सकल मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज जनावरांना मारल्यागत लाठ्या काठ्यांनी मारत तुडवल ,डोके फुटले तर कोणाचे न...

नेवासा प्रतिनिधी



जालना येथील सकल मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज जनावरांना मारल्यागत लाठ्या काठ्यांनी मारत तुडवल ,डोके फुटले तर कोणाचे नाक फुटले,छऱ्यांच्या बंदूकीनी फायरिंग केले गेले ,मराठा आरक्षण आंदोलकावर दडपशाही करून चिरडणाऱ्या सरकारचा जाणीवपूर्वक आमच्या माताभगिनी व लहान मुलाबाळांना दहशतीत घेऊन लाठीचार्जच्या निषेधार्थ भेंडा येथे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने निषेध करण्यात आला आहे.


 मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक कमलेश नवले म्हणाले मराठ्यांनी आता हातात लेखणी घेतली आहे परत एकदा त्यांना तलवार घ्यायला भाग पाडू नये असं मला सरकारला सांगणं आहे आम्हाला या मातीवरती या संविधानावरती आणि आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती प्रेम असल्यामुळे आम्ही शांततापूर्वक मार्गाने आतापर्यंत मोर्चे काढतोय इथून पुढे मोर्चे हे जाणीवपूर्वक सांगतोय की शांततापूर्ण नसून ठोक मोर्चा परत एकदा निघायला सुरुवात होतील याची दखल सरकारने घ्यावी.


या वेळी लहुजी सेनेचे प्रमुख सुरेश आढगळे,छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,प्रदिप आरगडे,ऋषी नवले,कल्याण ठुबे,मयुर बोधक,शुभम आरगडे,सुधीर आरगडे,आप्पासाहेब आरगडे,रोहित रुईकर,शुभम गव्हाणे,शिवसेनेचे महिला प्रमुख मीरा गुजांळ,अरविंद आरगडे,निलेश आरगडे,प्रतिक आरगडे,सिद्धांत आरगडे,ज्ञानेश्वर चामुटे,संकेत आरगडे,राहुल बोधक,सचिन तागड,दिपक नवले,सुरज आरगडे,ऋषी आरगडे,अक्षय चामुटे,रघुनाथ आरगडे,मुकेश आरगडे,प्रशांत आरगडे,अक्षय बोधक,राम आरगडे,प्रसाद पाटोळे, अनिल थोडे, विशाल निपुंगे,सुनिल महाजन,प्रविण चक्रनारायण,प्रविण थोरात,सोपान औताडे,योगेश आरगडे,शाम आरगडे, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत