राहुरी(वेबटीम) उपचारासाठी उशिरा आलेल्या रुग्णास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील विटनोर मल्टीस्पेशालिटी ह...
राहुरी(वेबटीम)
उपचारासाठी उशिरा आलेल्या रुग्णास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील विटनोर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अनिल विटनोर यांच्या विरोधात अट्रोसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र डॉ.विटनोर यांच्यावर दाखल झालेली अट्रोसिटी खोटी असून टाकळीमिया गावात बंद पाळण्यात आला आहे.खोटी अट्रोसिटी तातडीने मागे न घेतल्यास बेमुदत गावबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत प्रियंका संजय सगळगिळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा टाकळीमिया गावातील डॉ.अनिल विटनोर(रा.मांजरी) यांच्याकडे उपचारासाठी उशिरा गेले असता डॉ.विटनोर यांनी शिवीगाळ केली. त्यावर प्रियंका सगळगिळे यांनी डॉ.विटनोर यांना तुम्ही व्यवस्थित बोला असे म्हंटले असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादित म्हंटले आहे.
राहुरी पोलिसात प्रियंका सगळगिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.अनिल विटनोर यांच्याविरोधात अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान डॉ.विटनोर यांच्यावर दाखल झालेला अट्रोसिटीचा गुन्हा खोटा असून टाकळीमिया ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन संताप व्यक्त केला आहे. राहुरी पोलीस ठाणे येथे टाकळीमिया ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पोलीस निरीक्षक जाधव यांना निवेदन देऊन खोटी अट्रोसिटी तातडीने मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवी मोरे, तनपुरे कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन शाम निमसे, माजी सभापती सुरेश निमसे, ज्ञानदेव निमसे, शिवशंकर करपे, बाळासाहेब जाधव, किशोर मोरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत