राहुरी(वेबटीम) दाढ काढणीची फी मगितल्याच्या कारणावरून राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील विटनोर मल्टीस्पेशालिटी दातांचा दवाखान्यात अनाधिकार...
राहुरी(वेबटीम)
दाढ काढणीची फी मगितल्याच्या कारणावरून राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील विटनोर मल्टीस्पेशालिटी दातांचा दवाखान्यात अनाधिकाराने प्रवेश करून दवाखान्याची तोडफोड करून नुकसान करत अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ४ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ.प्राची विटनोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, टाकळिमियां येथील विटनोर मल्टीस्पेशालीटी दातांचा दवाखाना येथे प्रियंका सगळगिळे हिस दाढ तपासणीची फि मागीतल्याचे कारणावरुन मला व पती डॉ. अनिल विटनोर, दिर संदिप विटनोर यांना संजय सगळगिळे, केतन सगळगिळे, प्रियंका सगळगिळे, चंद्रकांत सगळगीळे यांनी शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की करुन दवाखान्यात अनाधिकाराने प्रवेश करुन दवाखान्यातील सामानाची तोडफोड करुन नुकसान करुन तुम्ही जर आमचे नादी लागले तर तुमच्यावर खोटे अँट्रोसीटीचे गुन्हे दाखल करुन तुम्हाला त्रास देवू अशी धमकी दिली.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात संजय सगळगिळे, केतन सगळगिळे, प्रियंका सगळगिळे, चंद्रकांत सगळगीळे यांच्या विरोधात भादंवि कलम 452, 427, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत