देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात आज शनिवारी व उद्या रविवारी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात आज शनिवारी व उद्या रविवारी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज २ सप्टेंबर व उद्य...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज २ सप्टेंबर व उद्या ३ सप्टेंबर या कालावधीत ४२ वी जूनियर गट मुले-मुली महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शूटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया अँमॅच्युअर शूटिंग बॉल असोसिएशन व अहमदनगर जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धेत राज्यातील ८ विभागाचे १६ संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ४ वाजता अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त जयंत वाघ, मुकेश मुळे यांच्या शुभहस्ते तर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी या याप्रसंगी सर्व क्रीडा प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत