राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील युवा उद्योजक तथा वर्धमान एजन्सीचे सर्वेसर्वा ऋषभ लोढा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील युवा उद्योजक तथा वर्धमान एजन्सीचे सर्वेसर्वा ऋषभ लोढा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.
प्रारंभी सकाळी अहमदनगर दक्षिणचे खा.डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शालेय गरजपोयोगी वस्तूंचे भेट देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती आवारे मॅडम यांच्या हस्ते ऋषभ लोढा यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.योगेश पगारे, गणेश डावखर,सागर भालेराव, प्रणय भोसले,सैफ शेख, पंकज हारदे, श्री. नालकर,ओंकार कोबरने आदींसह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन अमित देशमुख यांनी केले.
दरम्यान ऋषभ लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, धार्मिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी सन्मान केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत