राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे उद्या सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संकल्प नागरी पतसं...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथे उद्या सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संकल्प नागरी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्रीरामपूर रोड येथील आदीनाथ सर्व्हीस स्टेशनशेजारी येथे संकल्प पतसंस्थेचे उद्घाटन सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज व शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आ.चंद्रशेखर पाटील कदम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, सहायक निंबधक दीपक पराय, तहसीलदार चंद्रजित रजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक तथा संचालक अण्णासाहेब चोथे, आद्यप्रवर्तक तथा चेअरमन प्रा.सुधाकर कदम, व्हा.चेअरमन भालचंद्र थोरात तसेच संचालक डॉ.शौकत सय्यद, पारसमल खिंवसरा, विठ्ठल शेटे, विजयकुमार खळेकर, बबन डोंगरे, भारत शेटे, मुकुंद वेदपाठक, संदीप माने, सुजाता कदम, स्वाती काळे तसेच सर्व सभासद, कलेक्शन एजंट व कर्मचाऱ्यांनी केले आहे.,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत