राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथील पावन गणपती मंदिराचा १४ वा वर्धापनदिन विविध धार्मिक कार्यक्रम राबवून संपन्न ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथील पावन गणपती मंदिराचा १४ वा वर्धापनदिन विविध धार्मिक कार्यक्रम राबवून संपन्न झाला आहे. यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होती.
येथील गुरुकुल वसाहत येथील पावन गणपती मंदिराचा १४ व्या वर्धापनदिनानिमित्ताने सकाळी विधीवत पूजा संपन्न झाली तर सायंकाळी महाआरती होऊन हजारो भाविकांना महाप्रसादाचे आयोजन पावन गणपती मंदिराच्या वतीने करण्यात आले होते.
प्रसंगी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड,पावन गणपती मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, हभप संपत काका जाधव,आण्णासाहेब म्हसे,ऋषभ लोढा,आप्पासाहेब ढुस,गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर गोपाल शिंदे,अरुण गायकवाड,विलास अल्हाडे,बाळासाहेब भालेराव, श्री.गावडे,अरुण खांदे,सुभाष कोंडेकर आदिंसह मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,भाविक भक्त उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत