राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील कारखाना कॉलनीतील शिवतेज ग्रूप आयोजित नवरात्र उत्सव २०२३ निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील कारखाना कॉलनीतील शिवतेज ग्रूप आयोजित नवरात्र उत्सव २०२३ निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आई तुळजाभवानीची घटस्थापना शिवतेज ग्रूपचे धडाडीचे नेतृत्व अजय भाऊ खिलारी व गजानन घुगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सोमवार १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिजामाता भगिनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री ८.३० वा संगीत खुर्ची तर मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वा.एक मिनिट स्पर्धा, बुधवार १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी डान्स स्पर्धा, शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सत्याग्रुप प्रस्तुत भव्य दांडिया तर शनिवार २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता खुल्या रांगोळी स्पर्धा, शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी रात्री ठिक ८.३० वाजता. सावरा डान्स अकॅडमी नगरचा नृत्याचा आविष्कार कार्यक्रम देखील प्रेक्षकांची मने जिंकणार आहे रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायं.ठीक ७ वाजता ह.भ. प. निलेश महाराज कोरडे यांचे जाहीर हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवार २३ ऑक्टोबर रोजी सायं.८.३० वाजता प्रश्न मंजुषा(पब्लिक मस्ती) कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शिवतेज मित्र मंडळाने केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत